पिंपरी – पुणे व पिंपरी-चिंचवडकरांची पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) ही मुख्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. मात्र पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला वेगळा न्याय दिला जात असल्याने पिंपरी-चिंचवडकर व येथील लोकप्रतिनिधी “पीएमपी’च्या कारभारावर कमालीचे नाराज आहेत. पुण्याकडून 60 तर पिंपरी-चिंचवडकडून 40 टक्के निधी “पीएमपी’ला मिळतो. मात्र, प्रवाशांना सुविधा देण्यापासून ते अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त कारभारापर्यंत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. पुण्यात कारवाई करुन शिस्तीचा बडगा उगारणाऱ्या “पीएमपी’च्या अध्यक्षा नयना गुंडे पिंपरी-चिंचवडमध्ये “सर्जिकल स्ट्राईक’ कधी करणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment