पिंपरी - अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेने पुन्हा कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याअंतर्गत ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत इंद्रायणी नदीपात्रालगत उभारलेल्या हॉटेल मालकासह तळवडे, चिखली परिसरातील अनधिकृत बांधकामे करणाऱ्या २२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, त्याची पर्वा न करता काही ठिकाणी बिनधास्तपणे अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे सोमवारी ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत आढळले.

No comments:
Post a Comment