पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख रस्त्यांमुळेच पिंपरी-चिंचवडचा कायापालट झाला आहे. आता अंतर्गत डीपी रस्ते विकसित करण्याची गरज आहे. त्यासाठी आरक्षित जागा ताब्यात घेतल्या जाणार आहेत. डीपी रस्त्याच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेली अनधिकृत बांधकामे पाडण्याचा निर्णय महापौर राहूल जाधव यांनी घेतला आहे. तशा सूचनाही त्यांनी बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाला दिल्या आहेत. काही दिवसांत डीपी रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई हाती घेण्यात येणार आहे, तसेच यात राजकीय हस्तक्षेप चालू देणार नाही अशी माहिती महापौर जाधव यांनी दिली.
No comments:
Post a Comment