शहरात घडलेल्या अनुचित घटनेची शहानिशा करण्यासाठी पोलीस कर्मचा-यांच्या वेगवेगळी पथके तयार केली जाणार आहेत. एखाद्या भागात गुन्हेगारी घटना घडल्यास नागरिकांनी कंट्रोल रुमशी संपर्क साधावा. अवघ्या काही वेळातच त्याठिकाणी पोलिसांचे एक पथक हजर राहील. त्यामुळे गुन्हेगारी कृत्याला आळा बसून पोलिसांना माहिती कळविण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकांना प्राप्त होईल. त्यामुळेच “फोन ऑफ फ्रेण्ड” पोलीस आपल्या दारी ही संकल्पना राबविली जाणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी मंगळवारी (दि. 25) पत्रकार परिषदेत दिली.
No comments:
Post a Comment