पिंपरी - चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आणि संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे. संबंधित नाट्यगृहांचे काम पूर्ण होण्यास विलंब लागत असल्याने नाट्य कलावंत आणि नाट्यरसिकांची गैरसोय होत आहे. प्रा. मोरे प्रेक्षागृहाचे काम पूर्ण होण्यासाठी ऑक्टोबर उजाडणार आहे, तर अत्रे रंगमंदिराचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे.

No comments:
Post a Comment