पिंपरी – बांधकाम कोसळून होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर बांधकाम साहित्याची तपासणी करण्याबाबत बांधकाम व्यावसायिकांकडे जागृती वाढता आहे. त्याचा गैरफायदा घेत शहरात बांधकाम साहित्य टेस्टिंग लॅबचा सुळसुळाट झाला आहे. बांधकाम साहित्याची शास्त्रशुध्द तपासणी न करताच अहवाल दिला जात आहे. एवढेच नव्हे तर बांधकाम पुर्णत्वाचा दाखला मिळवण्यासाठी काही बांधकाम व्यावसायिक तपासणीसाठी एक तर प्रत्यक्षात दुसरेच साहित्य वापरत आहेत. याची फेरतपासणी करणारी कोणतीही शासकीय यंत्रणा नसल्याने बांधकामांच्या दर्जाबाबत साशंकता कायम आहे.
No comments:
Post a Comment