Tuesday, 9 October 2018

महापौरांच्या प्रभागात अपुरा पुरवठा

चिखली - महापौरांच्या प्रभागात अपुरा पुरवठा
चिखली परिसरात गेल्या आठ दहा दिवसांपासून अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे महापौर आणि विरोधी पक्षनेत्यांचे हे प्रभाग आहेत. चिखली गावात पाण्याची टाकी बांधूनही तिचा वापर करण्यात येत नसल्याने नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. धर्मराजनगर, रिव्हर रेसिडेन्सी भागातील सोसायट्यांमधील नागरिकांना टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागते. मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, कुदळवाडी, जाधववाडी, चिखली गावठाण परिसरात पाणीपुरवठा होत असला तरी अतिशय कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. सध्या आक्‍टोबर हीट जाणवू लागली आहे. काही दिवसांत दसरा आल्याने महिला कपडे आणि भांडे धुण्याची लगबग सुरू आहे. त्यातच अनेकजण नळजोडाला इलेक्‍ट्रीक मोटर लावून पाणीउपसा करतात. मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असून, काही नागरिक बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरतात. मात्र, पाणीपुरवठा विभागाचे यावर नियंत्रण नाही. इलेक्‍ट्रीक मोटर जप्त केल्या तरी मोठा राजकीय हस्तक्षेप होतो. त्यामुळे पाणीपुरवठा कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. चिखली परिसरात कामावर जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पिण्याचे पाणी मिळत नसल्याने कामगार महिला व बॅचलर मुलांची ओढाताण होत आहे. 

No comments:

Post a Comment