Wednesday 17 October 2018

पालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी होणार गोड!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड होणार आहे. दिवाळीसाठी 8.33 टक्के बोनस व 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. कर्मचा-यांबरोबरच शिक्षक व बालवाडी शिक्षकांना देखील हा लाभ दिला जाणार आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी सर्व कर्मचा-यांना मिळेल, याची तजवीज करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (मंगळवारी) लेखा विभागाला दिले.

No comments:

Post a Comment