पिंपरी - आकुर्डी आणि चिंचवड रेल्वे स्टेशन जोडणाऱ्या नवीन रस्त्यालगतच्या कचरा संकलन केंद्राजवळ दररोज मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात आहे. त्याचा परिसरातील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. महापालिकेचे कर्मचारी कचरा जाळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मात्र, आम्ही कचरा जाळत नसल्याचे महापालिका कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मग, कचरा जाळतोय कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


No comments:
Post a Comment