चौफेर न्यूज – देशातील सर्व कुटुंबांना 2022 पर्यंत घरे देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आगामी काळात 14 हजार 656 सदनिका बांधणार आहे. यापैकी 5 हजाराहून जास्त घरांच्या प्रकल्पाचे भूमीपूजन डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करणार असल्याचे प्राधिकरणाचे सदाशिव खाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
No comments:
Post a Comment