पुण्यात औद्योगिकीकरण वेगाने वाढत आहे. त्यामुळे भविष्यात लोकसंख्याही वेगाने वाढणार. त्यासाठी रस्ते, पाणी या सुविधा मिळणे आवश्यक आहेत. त्यातील रस्ते सुविधा देण्याचे काम सोपे आहे. मात्र, पाण्यासाठी निसर्गावरच अवलंबून राहावे लागते. पैसे देऊनही ते उपलब्ध होऊ शकत नाही. त्याकरिता पडणार्या पावसातून मिळणार्या पाण्याचे प्रभावी नियोजन करण्याचे धोरण पुणे महानगर प्राधिकरणाने स्वीकारले असून पुढील पन्नास वर्षांचा विचार करीत मास्टर प्लॅन करण्याचे नियोजन केले आहे. त्याची निविदाही नुकतीच प्रसिद्ध केली आहे.

No comments:
Post a Comment