पिंपरी - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील ठराविक रस्त्यांवर रहदारी वाढत असल्याचे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यात नगर रस्त्याने सर्वाधिक रहदारी असून, त्या खालोखाल हिंजवडी परिसरातील रस्त्यांचा समावेश आहे. नगर रस्त्याने दररोज एक लाख 38 हजार, तर हिंजवडीत एक लाख 13 हजार वाहनांची ये-जा सुरू असते. हे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर भर दिला जाणार आहे.
No comments:
Post a Comment