Tuesday, 12 March 2019

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अंतर्गत दोन लाखांहून अधिक बालकांना लसीकरण

पिंपरी  :  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार रविवार (दि 10) रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेचा शुभारंभ महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वैदयकीय संचालक डॉ .पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी महापौर राहुल जाधव यांचे शुभहस्ते महापालिकेच्या चिखलीतील म्हेत्रेवस्ती दवाखाना येथे केला आहे. यावेळी स्थानिक नगरसेविका योगीता नागरगोजे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी तथा वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, राज्य लसीकरण अधिकारी दिलीप पाटील, प्रांतपाल रो. एस. के. जैन, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या भोईर, रोटरी क्लबचे अध्यक्ष, पदाधिकारी व मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment