पिंपरी चिंचवड : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच पिंपरी चिंचवड महापालिकेने त्याचे पालन करण्यास सुरुवात केली आहे, याबाबतची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी सोमवारी दिली. पालिकेचे मुख्यालय, प्रभाग कार्यालये, शाळा, अन्य इमारती यावर असलेले राजकीय पक्ष व समाजावर प्रभाव टाकणार्या राजकीय कार्यकर्त्यांचे नामोउल्लेख असलेले फलक, जाहिराती एकतर हटविण्यात आले आहेत. किंवा, झाकण्यात आले आहेत. हे काम 24 तासात पूर्ण करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment