PUNE: Pimpri Chinchwad municipal commissioner Shravan Hardik ..
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 9 August 2018
घरचे पदार्थ मल्टिप्लेक्सला वर्ज्यच!
'सार्वजनिक ठिकाणी लोक घरचे पदार्थ खातात. त्या वेळी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत नाही का? मग केवळ सिनेमागृहात घरचे पदार्थ खाण्यास बंदी का,' असा सवाल करून मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला फटकारल्याने मल्टिप्लेक्सच्या मुद्द्यावर धरसोड भूमिका घेणाऱ्या सरकारची कोंडी झाली. न्यायालयाने मल्टिप्लेक्स चालकांनाही फटकारले असले, तरी मल्टिप्लेक्समध्ये घरगुती पदार्थ नेण्यास परवानगी किंवा तेथील खाद्यपदार्थांच्या दराबाबत कोणताही आदेश दिला नसल्याने या मुद्द्यावरून संभ्रम कायम राहिला आहे. यामुळे शहरातील बहुतांशी मल्टिप्लेक्समध्ये बुधवारी 'जैसे थे' परिस्थिती कायम होती.
मंडप धोरण यंदाही कागदावरच?
या धोरणातील तरतुदींचे सर्रास उल्लंघन सार्वजनिक गणेश मंडळांकडून होत असल्याचे गेल्यावर्षी स्पष्ट झाले होते.
मावळ बंद नळयोजनेचे भवितव्य अधांतरी
योजनेचा सुरुवातीचा ४०० कोटींचा खर्च वाढत जात आता सहाशे कोटींपेक्षा कितीतरी जास्त होणार आहे.
बोर्हाडेवाडी प्रकल्प ‘स्थायी’वर अवलंबून
पिंपरी-चिंचवड : पंतप्रधान आवास योजनेतील बोर्हाडेवाडी गृहप्रकल्पाचा पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिरणाच्या गृहप्रकल्पाशी तुलना करून सविस्तर अहवाल स्थायी समितीसमोर मांडला आहे. समिती जो निर्णय घेईल, त्यानुसार पालिका प्रशासन कारवाई करेल. या प्रकल्पाचा ‘डीपीआर’ राज्य व केंद्राच्या समितीने तपासणी करूनच मान्य केला आहे. त्यात नव्याने दुरूस्ती केल्यास पुन्हा राज्य व केंद्राची मान्यता घ्यावी लागणार, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
Maratha Kranti Morcha: पीएमपीचे काही मार्ग बंद
पुणे - मराठा आरक्षणासाठी विविध संघटनांनी गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर सहा मार्गावरील बससेवा बंद, तर आठ मार्गांवरील बस शहराच्या हद्दीपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय पीएमपी व्यवस्थापनाने घेतला आहे. तसेच १४ मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. उर्वरित मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यात येणार आहे. यासाठी भरारी पथकांची नेमणूक केली आहेत. तसेच बसच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आल्याचे सत्रूांनी सांगितले.

#SaathChal तुकाराम महाराज, मोरया गोसावी पालखीची भेट
पिंपरी - जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी आणि महासाधू मोरया गोसावी यांची पालखी रथात आणलेली मूर्ती यांची बुधवारी (ता. ८) चिंचवडगाव येथे प्रतिकात्मक भेट झाली. हा सोहळा भाविकांनी ‘याचि देही, याची डोळा’ अनुभवला. संत तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात यंदा प्रथमच चिंचवडमार्गे जात असल्याने भाविक आणि ग्रामस्थांमध्ये वेगळाच उत्साह पाहण्यास मिळाला.

Subscribe to:
Posts (Atom)