Tuesday, 1 January 2019

Pimpri: पीएमपीएलकडून पिंपरी-चिंचवडला सापत्नपणाची वागणूक – महापौर जाधव

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन मंडळ (पीएमपीएल) कडून पिंपरी-चिंचवड शहराला सापत्नपणाची वागणूक मिळत आहे. महापालिका 40 टक्के अर्थसाहाय्य पीएमपीएलला देतो. परंतु, त्या तुलनेत सुविधा दिल्या जात नाहीत. पुरेशा बस देखील दिल्या जात नाहीत. बीआरटी मार्ग तयार असून देखील बस उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. 

नव्या वर्षांत पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार सुसज्ज नेत्र रुग्णालय

पिंपरी पालिकेच्या वतीने मासूळकर कॉलनी येथे सुसज्ज नेत्र रुग्णालय उभारण्याचे काम सुरू आहे. नव्या वर्षांत हे नेत्र रुग्णालय आणि नागरी आरोग्य केंद्राची सुविधा शहरवासियांना मिळणार आहे.

‘काला सोना’च्या माध्यमातून कंपोस्ट खत निर्मितीची माहिती पोहोचणार घरोघरी

पिंपरी : घरातील ओल्या कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन करून त्यापासून कंपोस्ट खत निर्मिती केल्यास सेंद्रिय शेतीला चालना मिळेल. तसेच पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित आणि रसायन मिश्रित अन्नधान्यापासून दूर राहील. ओल्या कचर्‍यापासून खत निर्मिती केल्यास घरातून निघणार्‍या कचर्‍याची मोठी समस्या दूर होईल. यासाठी इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने पुढाकार घेऊन ‘काला सोना’ नावाने जनजागृती अभियान सुरु केले आहे. 

3 बीआरटी मार्ग तयार; पण बसच नाही

पिंपरी-चिंचवड : नागरिकांना विनाअडथळा जलद प्रवास करता यावा यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या काळेवाडी फाटा ते देहू आळंदी चिखली रस्ता, देहू ते आळंदी आणि आळंदी ते बोपखेल या नवीन बीआरटी मार्गावर धावण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपीएल)बस उपलब्ध नाहीत. पीएमपीएलच्या ताफ्यातील 990 बसपैकी बीआरटी संचलनासाठी केवळ 425 बस उपलब्ध होत आहेत. त्यामुळे नवीन बीआरटी मार्गावर बस सोडण्यास महामंडळ असमर्थ असल्याचे, पीएमपीएमएलच्या महाव्यवस्थापकांनी महापालिकेला कळविले आहे. त्यामुळे नवीन बीआरटी मार्ग सुरु होण्यास विलंब होणार आहे.

सातव्या वेतन आयोगासाठी महापालिकेत समिती गठीत करा

पिंपरी चिंचवड : महापालिकेतील शासनाच्या प्रशासकीय कर्मचार्‍यांना सातवा वेतणश्रेणी आयोग लागू करण्यात यावा. त्यासाठी समिती गठीत करून त्या संबंधीत ठरावाला सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने केली आहे.

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आर. टी. ओचे ‘हेल्प डेक्स’

पिंपरी  : राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील व सहाय्यक अधिकारी सुबोध मेडसिकर यांच्या पुढाकाराने  ‘हेल्प डेक्स’ सुरु करण्यात आले आहे.
वाहन परवाना, वाहन नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, खटला संदर्भातील केसेस, वाहन हस्तांतर आदी कामे कुठे होतील. याबाबत माहिती नागरिकांना नसते. नागरिकांना संपूर्ण कार्यालयात धावपळ होते. त्यामुळे त्यांचा भरपूर वेळ व श्रम वाया जातात. यामुळे अनेकवेळा नागरिकांच्या मनात आरटीओ’च्या कार्यालया संबंधित नकारात्मक भावना निर्माण होती. मात्र, त्यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी नागरिकांसाठी आता हेल्प डेक्स’ सुरु करण्यात आले आहे.

नागरवस्ती विकास योजना विभागातील समाज सेवकांची पदे रिक्त

पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागाकडून महिला बालकल्याण, मागासवर्गीय योजना, अपंग कल्याणकारी योजना राबविल्या जातात. सर्वसामान्य जनतेशी संबंधित कल्याणकारी योजना राबविल्या जात असल्याने या विभागात लोकप्रतिनिधींचा कायम राबता असतो. या विभागात प्रामुख्याने सामाजिक कार्यातील पदवी (एम.एस. डब्ल्यू) असलेले प्रशिक्षित कर्मचार्‍यांची आवश्यकता भासते. मुख्य समाज विकास अधिकारी, समाज विकास अधिकारी व समाजसेवक ही सर्व पदे एम.एस. डब्ल्यू. शैक्षणिक अर्हता असलेल्या कर्मचार्‍यांचा यात समावेश आहे. महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागात समाज सेवक कार्यरत असलेल्या महिला कर्मचार्‍याला जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास विलंब झाल्याने त्यांना महापालिका सेवेतून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे नागरवस्ती विकास योजना विभागातील समाज सेवकांची सर्वच पदे आता रिक्त झाली आहेत.