पीएमपीच्या ताफ्यात येणार १५0 नव्या बस: पुणे। दि. ६ (प्रतिनिधी)
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान (जेएनएनयूआरएम) योजनेंतर्गत नव्या १५0 बस खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल ५ महिन्यांच्या कालावधीनंतर शनिवारी झालेल्या पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत या नव्या बसच्या खरेदीची निविदा
प्रक्रियेस मान्यता देण्यात आली आहे.
पुणे महापालिकेसाठी १00 व पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी ५0 बसच्या खरेदीसाठी मान्यता नोव्हेंबर २0११ मध्ये देण्यात आली होती. यात पुण्यासाठी २९ कोटी तर पिंपरी-चिंचवडसाठी १४ कोटी ५0 लाख रुपयांचा निधी मंजूर होता. मात्र महापालिका निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यानंतर नवनियुक्त संचालकांची नेमणूक या कारणास्तव गेल्या ५ महिन्यांत पीएमपीच्या संचालक मंडळाची बैठक झाली नव्हती.
शनिवारच्या बैठकीत नवीन बस खरेदीचा निर्णय घेण्यात आल्याचे पीएमपीचे संचालक नगरसेवक प्रशांत जगताप व सहव्यवस्थापक अतिष कुलकर्णी यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment