Tuesday, 12 June 2012

स्वाइन फ्लूने डोके वर काढले

स्वाइन फ्लूने डोके वर काढले: पिंपरी। दि. १३ (प्रतिनिधी)

स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. शहरातील सहा केंद्रांवर आज २५२३ जणांची तपासणी करण्यात आली असून, १५0 जणांना फ्लूसदृश लक्षणे आढळून आली आहेत. स्वाइन फ्लू तपासणीसाठी रांगा वाढू लागल्या आहेत.

चिंचवड येथील खासगी रुग्णालयात मागील आठवड्यात स्वाइन फ्लूने एका महिलेचा मृत्यू झाला. ती महिला वर्षातील पहिला बळी ठरली. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालय, थेरगाव येथील आदित्य बिर्ला, निगडी व चिंचवड येथील लोकमान्य रुग्णालय, चिंचवड स्टेशन येथील निरामय, संत तुकारामनगर येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात स्वाइन फ्लू तपासणी केंद्र सुरू केले आहे. शनिवारी सहा केंद्रांवर तपासणी केलेल्यांपैकी १३५ जणांना फ्लूसदृश लक्षणे आढळून आली आहेत. त्यातील १८ जणांना टॅमी फ्लू गोळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली. रविवारी तपासणी केलेल्यांपैकी १५0 जणांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आली. त्यांपैकी १६ जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्या दिल्या आहेत. आजवर ९५९९८ जणांची तपासणी झाली असून, त्यात ९६२५ जणांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आली, तर २८८१ जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्या दिल्या आहेत. १0२ थुकींचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता ३५ जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाल्याचे आढळून आले.

तपासणीसाठी वाढू लागली रांग

शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येऊ लागले असून, महापालिकेने स्वाइन फ्लू नियंत्रणासाठी तातडीच्या उपाययोजना आखणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment