http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32013&To=10
पाच प्रवाशांच्या बळीनंतर अवैध प्रवासी वाहतुकीच्या विरोधात पोलीस जागे !
पिंपरी, 30 जून
अवैध प्रवासी वाहतूक करणा-या वाहनाला रविवारी (ता. 29) झालेल्या भीषण अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर वाहतूक पोलिसांना जाग आली असून सोमवारी (ता. 30) या वाहतुकीला 'ब्रेक' लावण्यासाठी नाशिक फाटा ते भक्ती-शक्ती चौक या पुणे-मुंबई महामार्गावर फिरते पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. याशिवाय चिंचवड-मुंबई मार्गावर अवैध प्रवासी करणा-या वाहतूकदारांचा 'अड्डा' असलेल्या चिंचवड स्टेशन परिसरात 'फिक्स पॉईन्ट'च्या माध्यमातून पोलीस खडा पहारा देत आहेत. पाच प्रवाशांचा बळी गेल्यानंतर जागे झालेल्या पोलिसांच्या या कृतीबद्दल 'बैल गेला आणि झोपा केला' अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment