Tuesday, 31 July 2012

"झेडपी'ने थकविले वर्गखोल्यांचे भाडे

"झेडपी'ने थकविले वर्गखोल्यांचे भाडेचाकण - नाणेकरवाडी (ता. खेड) येथील प्राथमिक शाळेला ग्रामपंचायतीने बांधून दिलेल्या आठ वर्गखोल्यांचे सुमारे बारा लाखांचे भाडे जिल्हा परिषदेने आठ वर्षांपासून थकविले आहे. वेळोवेळी मागणी करूनही जिल्हा परिषद भाडे देत नाही, त्यामुळे संतप्त ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला; पण जिल्हा परिषद सदस्य सुरेश गोरे, गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांच्या मधस्थीमुळे तूर्त तरी संकट टळले आहे.

No comments:

Post a Comment