बेकायदा बांधकाम प्रकरणी बिल्डर, आर्किटेक्ट 'ब्लॅक लिस्ट' होणार !
पिंपरी, 10 ऑगस्ट
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'पाडापाडी मोहिमे'मुळे काळजीत पडलेल्या शहरवासियांना दिलासा देण्यासाठी बांधकाम नियमावलीत सुसूत्रता आणण्याचा निर्णय आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी घेतला आहे. सर्वसामान्यांची फसवणूक टाळण्यासाठी आरक्षित जागा, अधिकृत परवाना दिलेल्या बांधकामांची माहिती महापालिकेचे संकेतस्थळ आणि नागरी सुविधा केंद्रांमध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे. बेकायदा बांधकामांच्या मुळावरच घाव घालण्यासाठी अशा बांधकामांच्या उभारणीत सहभागी असलेले बांधकाम व्यावसायिक, विकसक, वास्तू विशारद यांना 'ब्लॅक लिस्ट' केले जाणार आहे.
No comments:
Post a Comment