आमदारांनी थोपटले आयुक्तांविरोधात दंड: पिंपरी दि. ९ (प्रतिनिधी)
पिंपरी-चिंचवड परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुरू केलेल्या मोहिमेविरोधात लोकप्रतिनिधी सरसावले आहेत. आमदार विलास लांडे यांनी आज संताप व्यक्त केला. आयुक्त डॉ. परदेशी यांनी कारभारात सुधारणा न केल्यास त्यांच्या बदलीसाठी आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘आयुक्त येथे आल्यापासून नेमके काय करीत आहेत तेच मला समजेनासे झाले आहे. दिवसभर केवळ
बैठका घेऊन शहराचा विकास होत असतो काय?’’ जनतेच्या विरोधात जाऊन काम करणे योग्य नाही.
एखादी अनुचित घटना घडल्यास आयुक्त डॉ. परदेशी जबाबदारी घेतील का? असा सवाल आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
No comments:
Post a Comment