दुसर्या दिवशी कारवाई ठप्प: गजानननगरमध्ये आंदोलन यशस्वी झाल्याची भावना
भोसरी । दि. ९ (वार्ताहर)
अनधिकृत बांधकामविरोधी पथकाच्या विरोधात दिघीमध्ये बुधवारी उद्रेक झाल्यामुळे लोकप्रतिनिधींसह प्रशासनही हडबडून गेले. आंदोलकांनी प्रसंगी अंगावर बंदुकीच्या गोळ्या झेलू; पण बांधकामे पाडू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने मोहीमेस प्रखर विरोधाची शक्यता बळावली आहे. याचाच परिणाम म्हणून दिघीत आज कारवाई झाली नाही. यामुळे आपले आंदोलन यशस्वी झाल्याची भावना गजानननगरमध्ये होती.
No comments:
Post a Comment