http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32193&To=5
सर्वसामान्यांचे प्रस्ताव 'लालफिती'त मात्र पदोन्नती, पदनिर्मितीची प्रकरणे शासनाकडे
पिंपरी, 6 ऑगस्ट
सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक प्रस्ताव 'लालफिती'त गुंडाळून ठेवत अधिका-यांच्या पदोन्नती, पदनिर्मितीचे प्रकरणे शासन दरबारी धाडण्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेने तत्परता दाखविली आहे. मंत्रालयाला लागलेल्या आगीमध्ये प्रस्ताव जळाल्याच्या भीतीने महापालिकेने पुन्हा पाठविलेल्या प्रस्तावांमधून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. शासनाकडे पाठविलेल्या 61 पैकी तब्बल 46 प्रस्ताव प्रशासन विभागाकडील आहेत. मात्र वर्गवारीसह दंड आकारुन नियमित करता येणारी बांधकामे, घरकुलाच्या वाढीव खर्चाचा भार शासनाने उचलणे यांसारख्या असंख्य प्रस्तावाचा महापालिकेला विसर पडला आहे.
No comments:
Post a Comment