http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32164&To=9
'फ्रेंडशिप डे' ठरला तीन मित्रांच्या जीवनाचा अखेरचा दिवस !
तळेगाव दाभाडे, 5 ऑगस्ट
पंपावरून डिझेल भरून बाहेर पडणा-या ट्रेलरवर कार आदळून झालेल्या अपघातात कारमधील तीन मित्र जागीच ठार झाले. हा अपघात रविवारी पहाटे दोनच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा येथे लडकत पेट्रोलपंपासमोर घडला. मृतांमध्ये तळेगावच्या माजी नगराध्यक्षा विजया भांडवलकर यांच्या मुलाचा समावेश आहे. या दुर्दैवी अपघातामुळे तीन मित्रांच्या जीवनातील आजचा 'फ्रेंडशिप डे' अखेरचा ठरला.
No comments:
Post a Comment