Wednesday, 8 August 2012

‘फ्रेण्डशिप डे’च्या दिवशी गुलाब रुसलेलाच!

‘फ्रेण्डशिप डे’च्या दिवशी गुलाब रुसलेलाच!: पिंपरी । दि. ५ (प्रतिनिधी)

पिंपरी भाजी मंडईत मोठी आवक झाल्याने भाजीपाल्याचे दर कोसळले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत १0 रुपये असलेली मेथी, शेपू, पालक, कोथिंबीरचे दर निम्म्याने घटले. फळांचे दर कायम असून भारतीय सफरचंदाची आवक वाढली आहे. फ्रेण्डशिपच्या दिवशी मागणी नसल्याने गुलाबांची फुले रुसल्याचे चित्र दिसून आले.
पाऊस सर्वत्र चांगला स्थिरावल्याने भाजीपाल्याचे उत्पन्न चांगलेच वाढले आहे. चंदननगर, मंचर, खेड, पुणे, चाकण, शेल पिंपळगाव आदी भागातून भाजीपाल्याची मोठी आवक झाली. त्यामुळे मंडईत आज मोठय़ा प्रमाणात सर्वच गाळ्यांवर हिरवीगार भाजी दिसत होती.

No comments:

Post a Comment