मैत्रीचे नाते झाले अधिक घट्ट: पिंपरी । दि. ५ (प्रतिनिधी)
मैत्री म्हटलं ना खूप बरं वाटतं इतर नात्यांपेक्षा जास्त खरं वाटतं
रक्ताची नाती मनाप्रमाणे निवडता येत नाहीत. पण मैत्रीचं विश्व तर आपण निर्माण करू शकतो ना! मैत्रीची श्रीमंती वाढवितानाच ती चिरंतन ठेवण्याच्या आणाभाका आज अनेकांनी घेतल्या. त्याला निमित्त ठरला तो फ्रेण्डशिप डे. एकमेकांना शुभेच्छा देत मैत्रीचे बंध अधिक घट्ट करण्यात आले. मैत्रीतील ओलावा निरंतर जपण्याची आंतरिक तळमळ व्यक्त करीत रविवारी शहरात फ्रेण्डशिप डे साजरा झाला.
No comments:
Post a Comment