http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32879&To=5
औषधांच्या टाकाऊ पाकिटांपासून 'ज्वेलरी' !
पिंपरी, 1 सप्टेंबर, <b>निशा पाटील</b>
दागिने म्हटले महिलांचा 'विक पॉईंट' !. मॅचिंग आणि जरा हटके स्टाईल असलेली आर्टीफिशिअल ज्वेलरी घालायला सर्वांनाच आवडते. हाताच्या बांगड्यांपासून ते डोक्यावरील बिंदीपर्यंत ही सगळी ज्वेलरी औषधांच्या टाकाऊ पाकिटांपासून बनविली असेल तर ? त्याची कल्पनाही करणे शक्य नसले तरी निगडी येथील बहुआयामी कलाकार सरोज राव औषधांची पाकिटेच काय, अगदी खोकल्याच्या औषधांच्या बाटल्या, सलाईनची बाटली, खोकी यांपासून विविध दागिने तसेच शोभेच्या वस्तू तयार केल्या आहेत. त्याच्या त्यांनी महाराष्ट्रभर कार्यशाळा देखील घेतल्या आहेत.
No comments:
Post a Comment