http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32902&To=8
बहुमताच्या जोरावर जलाशय बुजविण्याचा प्रस्ताव मंजूर
पिंपरी, 1 सप्टेंबर
वाकड येथील नैसर्गिक जलाशय बुजवून त्याठिकाणी निवासी बांधकामास परवानगी देण्याच्या प्रस्तावावर आज (शनिवारी) महापालिका सभेत जोरदार चर्चा झाली. आर्थिक हितसंबंधातून नैसर्गिक जलाशय बुजविण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी मतदानाची मागणी केली. या प्रस्तावाच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेसच्या 59 तर प्रस्तावाच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि मनसेच्या 20 सदस्यांनी मतदान केले. बहुमताच्या जोरावर अखेर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
No comments:
Post a Comment