Sunday, 2 September 2012

नगररचना विभागाच्या कारभारावर सर्वपक्षीय नगरसेवकांची आगपाखड

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32894&To=10
नगररचना विभागाच्या कारभारावर सर्वपक्षीय नगरसेवकांची आगपाखड
पिंपरी,12 ऑगस्ट
महापालिकेचा नगररचना आणि विकास विभागातील अधिकारी केवळ पैशाच्या तालावर नाचतात, ठराविक बिल्डरांसाठी काम करतात सर्वसामान्यांना टीडीआर वाटप करताना त्रास देतात, टीडीआर विकणा-यांची साखळी तयार झाली असून भूसंपादन प्रक्रियेत अडथळे आणतात, अशा शब्दात सर्वपक्षीय नगरसेवकांनी नगररचना विभागाच्या कारभारावर आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ताशेरे ओढले. त्यावर भूसंपादनाची प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रक्रियेचा वेळ कमी करण्यासाठी प्रयत्न करु असे सांगत नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करुन भूसंपादनाची प्राधान्य यादी ठरविणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली.

No comments:

Post a Comment