Tuesday, 11 February 2014

डेक्कन रोव्हर्सला अजिंक्यपद

पिंपरी : सॅव्हिओ फर्नांडिसने नोंदविलेल्या दोन गोलांच्या बळावर डेक्कन रोव्हर्सने इंद्रायणी स्पोर्ट्स क्लबचा ३-0 असा सहज पराभव करून महापौरचषक राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकाविले.
महापालिकेने स्व. राजेश बहल स्पोर्ट्स अँन्ड फाउंडेशनच्या सहकार्याने संत तुकारामनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित केलेल्या स्पर्धेत फाल्कन सीएमएसने उस्मानाबादचा २-0 असा पराभव करून तिसरे स्थान मिळविले. त्यांच्या केवीन घाडगेने ३६ व्या आणि रोहित बोकरेने ३९ व्या मिनिटाला एकेक गोल केला. महिलांच्या सामन्यात सेंट अँन्ड्रय़ूजने जी. जी. इंटरनॅशनल स्कूलचा १-0 असा निसटता पराभव केला. सामन्यातील एकमेव गोल प्रणाली वैशंपायनने २0 व्या मिनिटाला केला.

No comments:

Post a Comment