पिंपरी - महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली चुकीची असून, ती तत्काळ रद्द करावी, यासाठी आयटी अभियंत्यांनी आता थेट कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना शेकडो ई-मेल पाठवून साकडे घातले आहे. माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मेल पाठवून या आयुक्तांच्या बदली मागील वास्तव कारण जनतेसाठी जाहीर करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, सोमवारी तिसऱ्या दिवशीही महायुतीच्या वतीने महापालिका प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने झाली. पोलिसांनी पंधरा कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
No comments:
Post a Comment