देशातील गरीब जनतेला परवडणा-या किंमतीत औषधे उत्पादन करणा-या पिंपरीतील हिंदुस्तान अॅण्टीबायोटिक्स कंपनी भांडवलाअभावी कोणत्याही क्षणी बंद पडण्याची शक्यता आहे. या कंपनीला वाचविण्यासाठी महापालिकेनेच पुढाकार घ्यावा अशी मागणी नगरसेवक अरूण बो-हाडे यांनी महापौर मोहिनी लांडे यांच्याकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहाय्याने 1954 साली हिंदुस्तान अॅण्टीबायोटिक्स कंपनी सुरू करण्यात आली. आज तिला साठ वर्षे पूर्ण होत असलेली ही कंपनी म्हणजे स्वतंत्र भारताचा लोकोपयोगी राष्ट्रीय प्रकल्प आणि पिंपरी -चिंचवड औद्योगिक शहराचा पाया आहे.
No comments:
Post a Comment