पिंपरी - चाकण (ता. खेड) येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ अखेरीस राजगुरुनगर (खेड) येथे होणार असल्याचे निश्चित झाले आहे. तेथील जागेस मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्यता दिली असून, ती ताब्यात घेण्याकरिता एका समितीची स्थापना करण्याचा निर्णयही राज्य सरकारने मंगळवारी (ता. 25) घेतला. त्यामुळे या विमानतळाचे घोडे 15 वर्षांनंतर गंगेत न्हाले असून, तो राजगुरुनगरच्या पूर्वेस असलेल्या "सेझ'च्या जागेत होणार, यावर शिक्कामोर्तब झाले; तसेच तो खेड तालुक्यातच होणार हेही निश्चित झाले आहे.
No comments:
Post a Comment