(विश्वास रिसबूड)
पुणे शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील मुख्य 17 रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणा सकाळी सात वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे रात्री सिग्नल बंद झाल्यानंतर प्रत्येक चौकामध्ये होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. (असा वाहतूक विभागाचा कयास आहे) पण, वाहतूक नियमांची 'ऐशी की तैशी' करणा-या पुणेकरांवर त्याचा काही परिणाम होणार आहे का, हा या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतो.
पुणेकर आणि वाहतुकीचे नियम यांचा दूरान्वयानेही संबंध नाही असे आजकाल शहरातील प्रत्येक रस्त्यावरून पाहायला मिळते. प्रत्येकजण 'घाई'ची लागल्यासारखी एकमेकांवर कुरघोडी करीत वाहने दामटत असतो. सिग्नल तोडणे, झेब्रा पट्ट्यांवर वाहने उभी करणे, डाव्याबाजूने ओव्हरटेक करून एकदम समोर येणे, वाहतूक कोंडी झाली असेल तर फुटपाथवरून दुचाक्या पुढे नेणे, सतत हॉर्न वाजवून डोक्याची 'मंडई' करणे,
No comments:
Post a Comment