Wednesday, 26 February 2014

शहरातील सिग्नल यंत्रणा सोळा तास ...

पुणे शहर वाहतूक शाखेचा निर्णय
पुणे शहरातील वाढती वाहनसंख्या व रस्त्यावरील प्रचंड वाहतूक यामुळे होणारी चौकांमधील वाहनांची कोंडी टाळण्यासाठी पुणे शहरातील 17 रस्त्यावरील असणारे स्वयंचलित वाहतूक सिग्नल हे सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत चालू ठेवण्यात येणार आहेत. अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी दिली.
वाहन चालकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षित व सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी या सिग्नल वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत.  पुणे वाहतुक शाखेकडील मनुष्यबळ विचारात घेऊन सर्व चौकामध्ये वाहतूक कर्मचारी नियमितपणे दिलेले नसतील तरीही सर्व वाहनचालकांनी स्वयंशिस्तीने सिग्नलचे पालन करून अपघात व वाहतूक कोंडी टाळावी असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment