(वर्षा कांबळे)
दिवसेंदिवस वाढती प्रवाशांची संख्या आणि लोकलची अपुरी संख्या आणि फे-या यामुळे जीवाची पर्वा न करता लोकलला लटकून प्रवास करणारे चाकरमानी. पुणे-लोणावळा दरम्यान धावणा-या लोकलचे हे नेहमीचे दृष्य. परंतु हा प्रवास सुखकर करण्यासाठी पुणे-मुंबई दरम्यान तिस-या रेल्वे ट्रॅकची योजना अजूनही निधीअभावी अधांतरी लोंबकळत आहे. शंभर कारणे व शंभर अडचणी सांगून प्रवाशांना गप्प करणे याशिवाय रेल्वे प्रशासनाला आजपर्यंत काही जमले नाही.
पुणे-लोणावळा लोकलच्या अपु-या सोयीमुळे पुणे लोणावळा लोकलसेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. दररोज नोकरी व्यवसायानिमित्त पुणे ते लोणावळा दरम्यान लाखो प्रवाशांची वर्दळ चालू असते. मोठ्या संख्येने विद्यार्थी व नोकरदारवर्ग प्रवास करीत असूनही लोकलची संख्या मर्यादितच आहे, लोकल वेळेवर धावत नसल्यामुळे लोकांचा त्यावरचा विश्वासच उडाला आहे.
No comments:
Post a Comment