पुणे - पुणे ते लोणावळा या दरम्यान उपनगरीय रेल्वे वाहतुकीसाठी तिसरा लोहमार्ग टाकण्याच्या कामाला कधी प्रारंभ होणार, याकडे रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. या मार्गासाठी ‘पीएमआरडीए’ने मान्यता देऊन या वर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूददेखील केली आहे. या मार्गासाठी दोन्ही महापालिकांनीही निधीचा वाटा उचलणे अपेक्षित असून, नवे कारभारी या मार्गाच्या खर्चाला मंजुरी देणार का, यावरच या मार्गाच्या विस्तारीकरणाचे भवितव्य ठरणार आहे. पुणे-लोणावळा या मार्गावर उपनगरीय रेल्वे सुरू करण्याचा मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचा प्रस्ताव आहे. भूसंपादन वगळता या प्रकल्पासाठी २ हजार ३०६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
No comments:
Post a Comment