चिखली - सणासुदीमुळे मालाला वाढलेली मागणी आणि आयातीवर घातलेली तात्पुरती बंदी, यामुळे घाऊक बाजारात कडधान्य व डाळींच्या भावात पाच ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यातच बाजारात मालाचा तुटवडा निर्माण होताच नफेखोरीसाठी मोठ्या प्रमाणात साठेबाजी केली जाते. यामुळेही भाव भडकले असून त्याचा परिणाम आता किरकोळ बाजारातही दिसू लागला असून, त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

No comments:
Post a Comment