Sunday, 10 September 2017

आता “गुड इव्हिनिंग’ पथकाचाही धसका!

– महापौर, आयुक्तांसह स्थानिक नगरसेवकांचाही समावेश
– महापालिकेकडून पथक स्थापन करण्याचे काम सुरू
पुणे, दि. 9 – लोटामुक्त घोषित झालेली शहरे पुन्हा लोटायुक्त होण्याची शक्‍यता असल्याने आता नागरी भागांमध्ये पुन्हा “गुडमॉर्निंग’ बरोबर आता “गुड इव्हिनिंग’ पथक स्थापन करून देखरेखीचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. मात्र, आता ही जबाबदारी फक्‍त स्वच्छता कर्मचारी किंवा घनकचरा व्यवस्थापन विभागावर न ठेवता पथकात थेट आयुक्त, महापौर तसेच पथक ज्या भागात जाईल, त्या भागातील स्थानिक नगरसेवकांचाही समावेशच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. येत्या काही दिवसांत हे पथक स्थापन करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

No comments:

Post a Comment