Wednesday 15 November 2017

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या 19 तज्ज्ञ डॉक्‍टरांना ‘डोस’

आयुक्‍तांनी दिला दणका; सुधारीत वेतनश्रेणीचा आदेश रद्द 
– डॉक्‍टरांच्या वेतनातून रक्‍कम वसुलीचे आदेश
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 19 विशेष तज्ज्ञ वर्ग-1 डॉक्‍टरांना सुधारीत वेतनश्रेणी लागू केली. त्यामुळे आयुक्‍तांच्या बरोबरीने त्यांची वेतनश्रेणी लागू झाली. मात्र, वैद्यकीय शाखाप्रमुख व उपशाखा प्रमुख अभिमानाची पदे पालिका आस्थापनेवर अस्तित्वात नाहीत. त्यामुळे सदरील आदेश रद्द करुन त्या आदेशाने दिलेली सुधारित वेतनश्रेणीनूसार रक्कम संबंधित डॉक्‍टरांच्या वेतन, सेवानिवृत्त वेतनातून वसूल करण्याचे आदेश आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. यामुळे पालिका वैद्यकीय विभागात खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment