पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात जागो-जागी रोडवर, आपल्या घरा-दुकानासमोर गतिरोधक टाकले जात आहेत. त्या बनविलेल्या गतिरोधकांमुळे अनेकांना पाठीदुखी, मणक्याचे आजार उद्भवू लागले आहेत. अनेक लोकांना गतिरोधकाचे दुष्परिणाम माहीत नसल्याने ते आपल्या घराच्या आजूबाजूला गतिरोधकांची मागणी करतात. मात्र, लोकांना जागृत करण्यासाठी महापालिकेने गतीरोधकाच्या दुष्परिणामावर नागरिकांत जनजागृती करावी, नियमांना हरताळ फासणारे गतिरोधक काढण्याची मागणी सुज्ञ नागरिकांतून होवू लागली आहे.
No comments:
Post a Comment