Wednesday, 15 November 2017

ग्राहक हितरक्षण

झगमगाटी जाहिरातींना भुलून आपण अनेक वस्तू खरेदी करतो; परंतु त्यातील अनेक वस्तू गुणात्मकदृष्ट्या जाहिरातीतील वर्णनानुसार असत नाहीत. परिणामी, ग्राहक म्हणून आपली फसवणूक होते. ऑनलाइन खरेदी व्यवहार वाढल्यामुळे व्यवसायांचे स्वरूपच बदलून गेले आहे आणि त्यामुळे फसवणुकीचे स्वरूपही बदलले आहे. हे बदल जेवढ्या वेगाने घडत आहेत, तेवढा वेग ग्राहकांच्या हितरक्षणासाठी योजल्या जाणाऱ्या उपाययोजनांमध्ये नाही. या पार्श्‍वभूमीवर, सरकारने ग्राहकहिताच्या रक्षणासाठी नव्या कडक कायद्याचा तयार केलेला प्रस्ताव स्वागतार्ह आहे.

No comments:

Post a Comment