पिंपरी – रिंग रोडसाठी हलचाली सुरु होताच हजारो नागरीक घर वाचविण्यासाठी एकत्र आले आणि त्यातून एक व्यापक आंदोलन उभे राहिले. गेली दीडशे दिवस हे आंदोलन वेगवेगळ्या मार्गाने सुरू आहे. कोणतेही ठोस आश्वासन मिळत नसतानाही बाधितांनी खूप संयम आणि सहनशक्ती दाखवली. दिंडी, चिंतन मोर्चा, मुख्यमंत्र्यांना पत्र, आमदारांना राखी बांधून साकडे, कोपरासभा, बैठका धरणे अशी कित्येक आंदोलने करुन बाधितांनी संपूर्ण शहराचे लक्ष आपल्याकडे वेधले. परंतु आता याच आंदोलनाला फुटीचे ग्रहण लागले आहे. घर बचाव संघर्ष समिती विरुद्ध स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ असा कलगीतुरा सध्या रिंग रोड बाधितांना अनुभवयास मिळत आहे.
No comments:
Post a Comment