पुण्यासह पिंपरी-चिंचवडच्या पाणी उपशावर राज्य सरकारने मर्यादा आणली आहे. आधीच शहरातील विविध भागात सुरु असलेली पाणी टंचाईची बोंब त्यात उपसावर येणारी मर्यादा यामुळे पाणी समस्या भविष्यात आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. चोविसतास पाणी पुरवठ्यासाठी सुरु असलेल्या महापालिकेच्या प्रयत्नावर यामुळे पाणी फिरण्याची भिती आहे. पूर्वी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकाळात शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत होते. मात्र, समाधानकारक पाऊस होवूनही भाजपच्या काळात पाणी टंचाईच्या तक्रारी वाढल्याचा सूर सर्वत्र आहे. नागरिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. यामध्ये खरोखरीच भाजपचे नियोजन चुकतेय की, महापालिकेतील अधिकाऱ्यांचा अघोषित असहकार त्याला कारणीभूत ठरतोय याबाबत शहरवासीयांमध्ये उलट-सुलट चर्चा आहे.
No comments:
Post a Comment