पिंपरी - चेहऱ्यावरील कुतुहलमिश्रित भाव.. त्याबाबत पडलेले असंख्य प्रश्न.. माध्यमांविषयीची आस्था आणि त्याच्या कार्यपद्धतीविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा..असे भारावलेले वातावरण ‘सकाळ’च्या पिंपरी कार्यालयाने सोमवारी (ता. ११) अनुभवले. निमित्त होते ‘बाल अतिथी संपादक’ उपक्रमाचे. शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या ‘सकाळ एनआयई’तर्फे ‘बालदिना’निमित्त हा उपक्रम आयोजिण्यात आला होता. शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थी व शिक्षक त्यामध्ये सहभागी झाले होते. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने विद्यार्थी भारावून गेले होते. त्यांनी ‘सकाळ’चे विशेष आभार मानले.

No comments:
Post a Comment