Tuesday, 14 November 2017

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामेट्रो तर्फे उपाय योजना

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या पहिल्या मार्गिकेवर सहयोग केंद्र आणि ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ कार्यान्वित 
प्रभात वृत्तसेवा
पुणे – “महामेट्रो’च्या वतीने पिंपरी-चिंचवड परिसरात होत असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी सध्या वेगाने काम सुरू आहे. प्रकल्पाअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते दापोडी येथील हॅरीस पूल दरम्यान सध्या व्हायाडक्‍टचे काम सुरू असून यामुळे वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम होत आहे. या कामामुळे होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामेट्रोच्या वतीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम्‌ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवली आहे.

No comments:

Post a Comment