Monday, 20 November 2017

फरार नगरसेवक हिंगेंना रजा मंजुरी

पिंपरी – महापालिकेचे भाजप नगरसेवक तुषार हिंगे यांच्याविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात ते फरार असून अजून पोलिसांचा सापडलेले नाहीत. मात्र, त्यांनी सादर केलेला रजेचा अर्ज महापालिकेच्या विधी समितीच्या बैठकीत मंजूर केला. तुषार हिंगे यांच्या सहीचा अर्ज पालिकेपर्यंत व्यवस्थितरित्या पोहचला, पण पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment