Wednesday, 8 November 2017

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रवादी पुन्हा रस्त्यावर

पिंपरी – नोटबंदीला एक वर्ष उलटले तरी बाजारपेठांची स्थिती विदारक आहे. अनधिकृत घरे नियमितीकरणातील किचकट अटी-शर्ती, शास्तीचा जाचक मुद्दा आणि बोपखेलच्या रस्त्यासह रिंगरोडच्या बाबतीत नागरिक संदिग्ध अवस्थेत आहेत. त्यातच नागरिकांना समाधानी जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या दैनंदीन सुविधा देण्यात सरकार आपयशी ठरले आहे. त्याच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत. येत्या गुरूवारी (दि. 9) पिंपरी-चिंचवड युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर आणि युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment