पिंपरी - नोटाबंदी झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड, पुणे शहर परिसरासह पुणे विभागात संशयास्पद आर्थिक व्यवहार करणाऱ्या सुमारे पाच हजार जणांना प्राप्तिकर खात्याकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या संबंधितांची चौकशी अद्याप सुरू असून, त्यांच्यामागील ससेमिरा कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आर्थिक व्यवहारात दोषी आढळणाऱ्यांवर प्राप्तिकर कायद्यानुसार कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून कर आणि दंड वसूल करण्यात येणार आहे. पुणे विभागातील या सर्व जणांच्या व्यवहारांची चौकशी पूर्ण होण्यास वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment